'आनंदाच्या शेतातला' "कला मोहोर" हा अगदी वेगळा उपक्रम आहे. "कलामोहोर... कलेचा आनंद, कलाकाराच्या सान्निध्यात!" या शब्दांतच या नव्या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे. 

आनंदाचं शेत म्हणजे पर्यटकांचं आवडतं फार्म ऑफ हॅपिनेस हे कोकणातलं कृषिपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण!
वसंत ऋतूत मोहोरानं फुललेल्या आंबा काजूच्या बागेत कलांचा मोहोरही फ़ुलावा हा "कलामोहोर" या संकल्पनेचा हेतू. 'कलामोहोर'च्या निमित्ताने, नामवंत कलाकारांबरोबर आनंदाच्या शेतात राहुन, त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी अनुभवता येणार आहे मोजक्या रसिक पर्यटकांना.

कल्पना करा, की तुम्ही एका नामवंत वादक, गायक, चित्रकार, शिल्पकार व्यक्तींबरोबर एकाच घरात, अंगणात, बागेत, शेतात वावरणार, उठणार बसणार आहात. त्या कलाकाराच्या सानिध्यात... गप्पा मारत, चहा कॉफी पिताना, त्यांच्याच तोंडून त्यांच्या कलेबद्दल, त्यांच्या कलाजगताबद्दल, गप्पा ऐकणार आहात! या कार्यक्रमाला ना स्टेज असेल ना निवेदक, ना साउंड सिस्टीम, ना स्पेशल लायटिंग! तुमच्यात आणि या मनस्वी कलाकारांत अंतर असणार आहे ते जेमतेम चार पाच फुटांचं. त्यानं आपल्या कलेचा जादुई पेटारा उघडावा आणि आपण लहान मुलांच्या कुतूहलानं त्याच्याभोवती कोंडाळ करून जमावं... मग त्याने प्रत्येकाच्या कुतुहलाला तोंड देता देता त्या पेटार्यातून एकेक चमत्कारी नमुना बाहेर काढून दाखवावा!

हा फॉर्मल कार्यक्रम नाहीच... ही असणार आहे एक आनंदाची मैफल, आनंदाच्या शेतातली!

या वर्षीचा म्हणजेच 2023 चा 'कलामोहोर’, "आनंदाचं शेत कृषी पर्यटन होम स्टे” अर्थात “Farm of Happiness Agro Tourism Homestay” मध्ये साजरा होत आहे ख्यातनाम शिल्पकार “भगवान रामपुरे” यांच्या बरोबर.

भगवान रामपुरे यांच्या समवेत ७ एप्रिल ते ९ एप्रिल आपल्याला राहाता येणार आहे आनंदाच्या शेतात. यात कोण कोण सामील होऊ शकतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सांगायला आनंद होतोय की, त्यासाठी तुम्ही कलाकार, शिल्पकार, चित्रकार, कलेचे विद्यार्थी असा किंवा नसा परंतु शिल्पकले विषयी उत्सुकता  असणारे, कलाकाराचे काम प्रत्यक्ष पाहू इच्छिणारे, त्याचे अनुभव, विचार प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकण्याचा आनंद घेऊ इच्छिणारे असे सर्वजण यात आपल्या कुटूंबियांसमवेत, मित्र-मैत्रिणींसह सहभागी होऊ शकतात.

लहानपणी देव देवतांच्या मूर्ती करून घरातील अर्थाजनाला आधार देण्याचा प्रयत्न करणारे भगवान रामपुरे आज एक राष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.  "माती संवेदनाशील असते आणि त्यामुळेच आणि तिच्याशी संवाद साधता आला तर तुमचं मन ती ओळखते आणि तुम्हाला हवा तसा आकार घेते” असं म्हणणाऱ्या रामपुरेंची शिल्पं त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. 

कवी ग्रेस, नाटककार विजय तेंडुलकर, कवी गुलझार, दीनानाथ मंगेशकर, अशा अनेक प्रतिभावंतांची शिल्पं रामपुरे यांनी केलेली आहेत. त्यांनी जाहिरात व उद्योग क्षेत्राशी संबंधित शिल्पंसुद्धा केली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ‘चार्जिंग बुल’ या वृषभ शिल्पानं त्यांना प्रसिद्धी दिली आणि त्याच बरोबर, अध्यात्मिकतेचा पाया असलेल्या या कलाकाराच्या हातून घडलेल्या काही अमूर्त किंवा संकल्पशिल्पांनी त्यांना विशेष ओळखही दिली आहे. 

 भगवान रामपुरे आणि त्यांच्या कलेविषयी जाणून घेण्याकरता काही व्हिडिओज च्या लिंक्स् पुढे देत आहोत:
https://youtu.be/HhntNPY6VEU
https://youtu.be/_uG58k4Bu0U
https://youtu.be/JcbE5sN9SSo
https://youtu.be/AigJQvnoP7c

या तीन दिवसात काय काय घडेल?
७ एप्रिल - (दिवस १) दुपारी ४:००-६:००: वाजल्यापासून 
पर्यटक पाहुण्यांचं आगमन, परिचय / ओळख पाळख, अनौपचारिक गप्पा होतील.

८ एप्रिल - (दिवस २)
सकाळ सत्र- लाईव्ह पोर्ट्रेट डेमो होईल.
दुपारी सत्र- प्रश्नोत्तरं, गप्पा, शंका निरसन होईल.
संध्याकाळ - स्लाईड शो ज्याद्वारे ते त्यांच्या आधीच्या कामांबद्दल बोलतील.

९ एप्रिल - (दिवस ३)
सकाळ सत्र- डेमो 
दुपारी सत्र- प्रश्नोत्तरं, सहभागी पाहुण्यांची मातीच्या स्कल्प्टींगशी ओळख, एखादी संकल्पना/काॅन्सेप्ट  घेऊन एक्सरसाइझ होईल.
संध्याकाळ - प्रश्नोत्तरं, शंका निरसन, समारोप होईल.

  एकूण या तीन दिवसांत काय काय घडेल तर गप्पा /  लाईव्ह डेमो / माॅडेल / पोर्ट्रेट / अमूर्त / नव्या प्रयोगंविषयी गप्पा / स्लाईड शो / वास्तववादी, वैचारिक किंवा अमूर्त, स्पिरीच्युअल शिल्पांबद्दल चर्चा, गप्पा या सर्व उपक्रमात तुम्हाला शेतावर, निसर्गरम्य ठिकाणचा निवास आणि अस्सल महाराष्ट्रीय सुग्रास जेवण  मिळणार आहे.

कलामोहोर २०२२

२०२२ मधल्या पहिल्याच 'कलामोहोर'च्या निमित्ताने इथे रहायला आम्ही आमंत्रित केलं होतं, गुणी आणि नामवंत बासरी वादक श्री अश्विन श्रीनिवासन यांना. आणि त्यांच्याबरोबर आनंदाच्या शेतात राहुन, त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी अनुभवायला सहभागी झाले होते काही मोजके रसिक पर्यटक पाहुणे. दोन दिवस अश्विनजींसारख्या कलाकाराच्या सान्निध्यात राहून, म्हणजे एकाच घरात, अंगणात, बागेत, शेतात त्याच्या बरोबर जो अनुभव या पाहुण्यांना मिळाला... तो व्हिडिओतून मांडणं केवळ अशक्य! 

पण तरीही २०२२च्या कलामोहोर उपक्रमाचा छोटासा व्हिडिओ बनवला आहे, या पाहुण्यांच्याच शब्दांतून त्या जादुई अनुभवाची अनुभूती देण्याचा प्रयत्न म्हणून! या व्हिडीओची लिंक या पेजच्या तळाशी दिली आहे… ती नक्की पहा आणि आश्विनजींच्या बासरीवादनाचा आनंद घ्या!

"कलामोहोर 2023" उपक्रमाचे दर

(उपक्रमाचं चेक इन ७ एप्रिल संध्याकाळी ४:०० पासून - चेक आउट १० एप्रिल सकाळी ११:०० पर्यंत)*:

रू. २०,०००/-
फक्त

View Rooms

१ खोलीत २ व्यक्तींसाठी दर

(प्रत्येक खोलीत मूळ दोन व्यक्तीं व्यतिरिक्त 2 अधिक व्यक्ती सामावून घेता येतात.
आवश्यकतेनुसार त्या व्यक्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त दर आकारून अतिरिक्त पलंग दिला/ दिले जातात.)

वरील दरात समाविष्ट बाबी:
* ३ रात्री आणि २ दिवस निवास
(चेक इन ७ एप्रिल संध्याकाळी ४:०० - चेक आउट १० एप्रिल सकाळी ११:००)
* कलामोहोर कलाकाराबरोबर सहवास, गप्पा, कलास्वाद
* सकाळचा चहा/कॉफी/दूध, न्याहारी (शाकाहारी)
* दुपारचे जेवण (शाकाहारी)
* संध्याकाळचा चहा/कॉफी/दूध, फराळ (शाकाहारी)
* रात्रीचे जेवण (शाकाहारी)
* या व्यतिरिक्त दिवसभरात, चहा/कॉफी/सरबत हवे असल्यास

रु. ७,०००/-*

अतिरिक्त व्यक्तीच्या निवासाचा दर

(वय 12 वर्षांपेक्षा आधी असल्यास)

रु. ८,०००/-*

अतिरिक्त व्यक्तीच्या निवासाचा दर

(वय 12 वर्षांपेक्षा आधी असल्यास)

रु. ५,०००/-*

अतिरिक्त अपत्याच्या निवासाचा दर

(वय 6-12 वर्षांच्या दरम्यान असल्यास)

६ वर्षांखालील मुलांना या उपक्रमासाठी प्रवेश देता येणार नाही. क्षमस्व!

महत्वाचे:

** पूर्ण ३ रात्री आणि २ दिवसांचे पॅकेज बुकिंग आवश्यक.*
** बुकिंग किमान ४ दिवस आधी करणे आवश्यक.*
** बुकिंग नक्की करण्यासाठी पूर्ण १००% रक्कम आगाऊ भरणे आवश्यक.*
** घरगुती पद्धतीचे, स्थानिक चवीचे मांसाहारी पदार्थ आगाऊ मागणी केल्यास अतिरिक्त दराने उपलब्ध. ** पूर्ण निवास आणि आजूबाजूच्या परिसरात धूम्रपान आणि मद्यपान पूर्णतः निषिद्ध आहे.*

बुकिंग रद्द करायचे झाल्यास:
1 चेक-इन तारखेच्या अगोदर किमान ३० दिवस आधी बुकिंग रद्द केल्यास आगाऊ म्हणून दिलेली संपूर्ण रक्कम परत केली जाईल.
2 चेक-इन तारखेच्या अगोदरच्या ३० ते २१ दिवस दरमयान बुकिंग रद्द केल्यास एकूण शुल्काच्या ५०% राखून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
3 चेक-इन तारखेच्या अगोदरच्या फक्त २१ ते १५ दिवस दरमयान बुकिंग रद्द केल्यास एकूण शुल्काच्या १००% रक्कम बुकिंग अचानक रद्द करण्याअपोटी आकारली जाईल.

Book now for Kala Mohar

MAKE A RESERVATION Request

Full Name

Country

State

City

Phone #

Mobile

Email Id

No. of Adult Travellers

No. of Children (6 - 12 yrs)

Check In - Check Out

Booking For